प्राथमिक आरोग्य केंद्र कुह्राडी येथे एकाच दिवशी तीन यशस्वी प्रसुती

0
13

गोरेगाव,दि.१२ः तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कुह्राडी येथे एकाच दिवशी तीन सफल प्रसुती करण्यात आल्या.त्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्तिकुमार चुलपार व डॉ.अमित मजुमदार  वैदयकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात यशस्वी प्रसुती झाल्या असुन तीनही माता व बालकांची प्रकृती उत्तम आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कुह्राडी कार्यक्षेत्रातील पहीली प्रसुती रिता संजय उके गाव बाघोली यांची पहाटे 5.45 वाजता , दुसरी प्रसुती विद्या प्रमोद पटले गाव कुह्राडी यांची दुपारी 11.05 वाजता तर तिसरी प्रसुती प्रिया अंकुश मारबदे गाव हिरापूर हिची दुपारी 2.45 वाजता आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्या असुन माता व बालक हे आरोग्य कर्मचार्यांच्या निगराणीत भरती आहे.सदर तीनही सफल प्रसुती करण्यासाठी आरोग्य सेविका ललिता पटले व बिसेन तसेच आशा सेविका नलिनी रामटेके, गीता पटले, ममता बिसेन तसेच मदतनीस साधना मेश्राम यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. त्यांच्या ह्या भरीव आरोग्य सेवेबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र कुह्राडीचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या संपुर्ण टिमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले आहे.माता व बाल आरोग्य कार्यक्रम अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रानी आपल्या कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवुन नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी झटत आहुन आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या सुचना दिल्या आहेत
 माता व बालकांची देखरेख –
माता व बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आरोग्यवर्धिनी स्तरावर सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहायिका,आरोग्य सेविका, स्टाफ नर्स व आशा सेविकामार्फत गरोदर मातांची गुणात्मक प्रसूची पूर्व व प्रसुती पश्चात सेवा दिली जात आहे. कार्यक्षेत्रातील नवविवाहित मातांची मासिक पाळी चुकल्यानंतर गरोदरपणाची लघवी तपासणी करण्यात येत असून गरोदर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास माता बाल संगोपन कार्ड बनवण्यात येत असते. गरोदर मातांची प्रसुतीपूर्व चार भेटी देऊन प्रतिबंधात्मक धनुर्वात इंजेक्शन आयर्न फ़ॉलिक अ‍ॅसिड व कॅल्शियम गोळ्या देऊन रक्तक्षयावर देखरेख ठेवण्यात येत आहे. हिमोग्लोबिन व रक्तदाब नियमित तपासणी करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. सर्व आरोग्य संस्थेतस्तरावर सुरक्षित प्रसूती करण्यात येत असुन माता व बालक यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.मानव विकास शिबीरातुन गरोदर माता व बालकांची विशेष तज्ञ डॉक्टरामार्फत तपासणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृवदंन योजना, मातृत्व अनुदान योजनेतुन आर्थिक मदत देवुन आरोग्य सुद्रुढ ठेवण्यास हातभार लावण्यासाठी कटीबध आहे.
-डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी