मतमोजणीच्या कामात दक्ष राहून मतमोजणी करावी

0
8

 निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश

 मतमोजणीची पूर्व तयारी बैठक संपन्न

        भंडारा दि. 13 – 11 भंडारा गोंदिया  लोकसभा मतदार संघाच्या मतदानाची मतमेाजणी येत्या 4 जून रोजी  पलाडी येथे होणार असून त्या दृष्टीने मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून मतमोजणी करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भंडारा  योगेश कुंभेजकर यांनी आज सोमवारी बैठकीत दिले.

       या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा स्मिता बेलपत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया विजया बनकर, नोडल अधिकारी  प्रशिक्षण लिना फलके, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यासह सर्व नोडल, अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

            यावेळी मतमोजणीसाठी करावयाची टेबलनिहाय रचना, माध्यम कक्ष, सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, आपत्ती संबंधी नियंत्रण कक्ष,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  यांनी करावयाची पूर्वतयारी, भोजन व्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेतील गोपनियता याबाबत श्रीमती लिना फलके यांनी पिपीटीसह सादरीकरण केले.  या मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी कर्मचाऱ्यासाठी प्रथमोपचाराचे साहित्य व वैद्यकिय उपचार सुविधेबाबतही निर्देश देण्यात आले.