रस्त्याच्या कामासाठी वनक्षेत्रातून काढला मुरूम, चार वनकर्मचारी निलंबित

0
88

गडचिरोली : दुर्गम भागातील रस्त्याच्या कामासाठी वनक्षेत्रातून मुरूम काढणाऱ्या कंत्राटदाराकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत दोन वनरक्षक आणि दोन क्षेत्र सहायकांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना यांनी केली.

प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली तालुक्यातील कसनसूर या भागात रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी कंत्राटदाराने लगतच्या वनक्षेत्रातून मुरूम काढला. पण त्यावर कारवाई करण्याएेवजी संबंधित वन कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. याबाबतची माहिती वनअधिकाऱ्यांना मिळाळ्यानंतर भामरागडच्या सहायक वनसंरक्षकांनी चौकशी करून उपवनसंरक्षक मीना यांच्याकडे अहवाल सादर केला. त्या आधारे झुरी क्षेत्राचे वनरक्षक एम.ए.निलेकार, सोहगावचे वनरक्षक बी.डी.उसेंडी, वागेझरीचे क्षेत्र सहायक ए.आर.कुमरे आणि भापडाचे क्षेत्र सहायक डी.के.वासेकर यांना निलंबित करण्यात आले.