धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे उर्वरीत काम जलदगतीने करा-आ.रहागंडाले

0
25

तिरोडा,दि.१६ः तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा लाभ शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतक-यांना मिळावा.तसेच या योजनेपासून लाभक्षेत्रातील कोणताही शेतकरी वंचित राहू नये.योजनेचे काम जलदगतीने व्हावे याकरिता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालय नागपूर येथे आज १६ मे रोजी आमदार विजय रहागंडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक पार पडली.या बैठकीमध्ये प्रामुख्याने धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ अंतर्गत इंग्रजकालीन बोदलकसा व चोरखमारा वितरण प्रणालीची (कालवा) दुरुस्ती करणे,संग्रामपूर व खळबंदा संपूर्ण कालवे दुरूस्ती वितरण प्रणालीची संपुर्ण दुरुस्ती करणे,इत्यादी महत्वपूर्ण सिंचनविषयक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने प्रकल्प संचालक श्री सोनटक्के, अधीक्षक अभियंता नागपूर पाटपंधारे विभाग मंडळ संजय विश्वकर्मा, उपसा सिंचन प्रकल्प तिरोडा कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, गोंदिया पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले,प.स.सदस्य अजाबराव रिनाईत,दवनिवाडा मंडळअध्यक्ष धनेंद्र अटरे,माजी उपसभापती रमेश चिल्हारे,कैलास गौतम,सुरेश पटले व विभागांतर्गत सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
.