रेल्वे प्रशासनाचा दणका; १२२४९ प्रकरणात ५१.८१ लाखांचा दंड वसूल

0
9

गोंदिया (Gondia Railway) : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या विविध रेल्वेस्थानकावर (Railway station) रेल्वेगाडी आणि स्थानकांमध्ये १ ते १० मे दरम्यान विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत विना तिकीट, अनियमित यात्रा, बुकिंग न करता लगेज वाहतूक आदिंचे १२२४९ प्रकरणांची नोंद करून ५१ लाख ८१ हजार ६४० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वे लोहमार्गावरील रेल्वे स्थानक, रेल्वेगाडीमध्ये विशेष तपासणी अभियान राबवून रेल्वे प्रवाशांच्या त्वरित निवाकरण करण्यात आले.

यातंर्गत तिकीट निरीक्षक, वाणिज्यीक निरीक्षक आदिंच्या मदतीने रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणे, अनियमित यात्रा करणारे, बुकींग न करता मालवाहतूक, लगेज वाहतूक आदिंची तपासणी करण्यात आली. १ ते १० मे दरम्यान राबविण्यात आलेल्या तपासणी अभियानात १२२४९ जणांवर (Railway administration) रेल्वे प्रशासनाच्या वतीने कारवाई करीत त्यांच्याकडून ५१ लाख ८१ हजार ६४० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या विविध समस्यांचे निराकरणही करण्यात आले.

२६२७ प्रकरणात दंडात्मक कारवाई

रेल्वेच्या प्रशासनाच्या वाणिज्यीक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेले विविध प्रकारच्या तपासणी अभियान राबविण्यात आले. यामध्ये विना तिकीट प्रवास, अनियमित यात्रा, बुकींग न करता मालवाहतुकीसह इतर प्रकारचे २६२७ प्रकरण नोंद करण्यात आली. या २६२७ प्रकरणी दंडात्मक कारवाई करून ८ लाख ७२ हजार ३७० रूपयाचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धुम्रपान करणार्‍या १० जणांवर कारवाई करीत २ हजार रूपये तर, रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता करणार्‍या १५७ प्रवाशांना दणका देत १५ हजार ९०० रूपयाचा दंड वसुल करण्यात आला.