मतमोजणीच्या पुर्वतयारीचा आढावा,पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

0
10

भंडारा, दि.29 :19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा मतदानाची मतमोजणी पलाडी येथे 4 जून रोजी सकाळी आठपासून सुरू होणार आहे. मतमोजणीच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाचा आढावा काल निवडणुक निणय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला.

   काल सायंकाळी पाच वाजता झालेल्या या बैठकीस दोन्ही जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थीत होते.यावेळी पलाडी येथील स्ट्रॉगरूम बाजूला असलेल्या सभागहात मतमोजणी होणार असून 2000 अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या दिवशी विविध कामासाठी कार्यरत असणार आहेत.मतमोजणीला सकाळी आठपासुन सुरवात होईल.

यासाठी विधानसभा निहाय मतमोजणीसाठी कर्मचाऱ्याची बैठक व्यवस्था,सीसीटीव्ही तसेच संपुर्ण प्रक्रीयेची व्हीडीयोग्राफी होणार असून त्याबाबतीत सूचना जिल्हाधिका-यांनी दिला.

मतमोजणीच्या 21 फे-या होणार असून त्यामध्ये 14 टेबलवर मतमोजणी होईल.टपाली मतमोजणीसाठी 20 तर इटीबीपीएस मतमोजणीसाठी 14 टेबल असतील.

मतमोजणीसाठी सहायक निवडणुक निर्णय अधिका-यांची अधिनस्त कर्मचारी मतमोजणी करून ती एक्सेल शीट तसेच मॅन्युअलमध्ये करून खात्री करून encore ॲपवर अपलोड करतील.ती माहिती थेट eci.gov.in या आयोगाच्या वेबसाईटवर पाहता येईल.मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे प्रशीक्षण झाले असून त्यांना मतमोजणीच्या पासेस तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनीधींनाही 31 मेपर्यत अर्जाव्दारे ओळखपत्र देण्यात येतील.

मतमोजणीच्या वेळी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पुरेश्या प्रमाणात औषध पुरवठा तसेच वैदयकीय मदत तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांना दिल्यात.यावेळी पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून 1 जूनला मतमोजणी सभागहाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.सोबत मिडीया सेंटर तसेच संपर्क व्यवस्था,मतमोजणी प्रक्रीयेची गोपनीयतेबाबत आवश्यक त्या सूचना नोडल अधिका-यांना देण्यात आल्या.