दीड महिन्यात मतमोजणी सभागृहाचे काम पूर्ण;अद्यावत व सुसज्ज मतमोजणी सभागृह

0
27

भंडारा, दि.3 :लोकसभा 2024 साठी 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी पलाडी येथील बाजूला प्रशस्त सभागृहाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाने अगदी विक्रमी वेळेत करून प्रशस्त अशी वास्तू उभारली आहे.

1.86 कोटी रुपयांच्या निधीमध्ये वीस मीटर बाय 60 मीटरचा प्रशस्त हॉल उभारण्यात आलेला आहे की कायमस्वरूपी रचना आहे.

          अवघ्या 45 दिवसाच्या विक्रमी वेळेत मतमोजणीच्या साठी ह्या प्रशस्त हॉलची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पराग ठमके व त्यांच्या अधिनस्त कार्यरत सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी  मतमोजणीसाठी ह्या सभागृहाची निर्मिती केली आहे.

चौकट

         सार्वजनिक बांधकाम विभाग भंडाराच्या वतीने पलाडी येथे मतमोजणी सभागृहाचे देखणे व प्रशस्त बांधकाम केले आहे. कायमस्वरूपी वास्तू आहे . यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वास्तूच्या निर्मितीत योगदान दिले आहे.पराग ठमके ,कार्यकारी अभियंता, भंडारा, सार्वजनिक बांधकाम विभाग.