आदर्श वाचनालय मोहाडी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0
18

गोरेगाव,दि.०६ जून- तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक ६ जुन ला शिवराज्याभिषेक स्थापना दिवस साजरा करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्राम पंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे, सेवानिवृत्त पोस्टमास्तर हिरालाल महाजन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे.पटले,आर.एफ.पारधी,प्रमानंद तिरेले, शिवराम मोहनकार, तेजलाल कावडे, देवदास चेचाने, चंन्द्रकुमार चौरागडे, मुकेश येरखडे,सेवा सहकारी संस्थाचे संचालक योगेश्वर पटले,बी.एम.सोनवणे,वामणराव भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजापैकी एक आहेत ६ जुन रोजी स्वराज्य स्थापनेचा सुवर्ण क्षण असलेला शिवराज्याभिषेक दिन आहे ३४८ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजाचा शासक म्हणून ६ जुन १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राजगड किल्ल्यांवर राज्यभिषेक करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शुभम ठाकुर यांनी केले यावेळी गावातील नागरिक व वाचक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.