अर्जुनी मोर.– वैयक्तीक व सार्वजनिक कामासाठी तथा इतरत्र कार्यक्रमाला जनतेला पिण्याचे पाणी सुलभरित्या मिळावे या साठी गोंदिया जिल्हा परिषद नी 15 व्या वित्त आयोग जिल्हास्तर निधी अंतर्गत अर्जुनी मोर. तालुक्यातील सात जिल्हा परिषद क्षेत्राला जल रथ देण्यात आल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदचे गटनेते तथा बोंडगावदेवी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी सांगितले.
र गोंदिया जिल्हा परिषद नी 15 वा वित्त आयोग जिल्हास्तर निधी अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक जि.प.सदस्यांना वैयक्तीक क्षेत्राचे विकासासाठी प्रत्येकी दहा लक्ष निधी देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार अनेक जि.प.सदस्यांनी पिण्याचे पाण्याची गरज लक्षात घेता जल रथ घेण्याचे ठरविले.व उर्वरीत निधीतून क्षेत्रात विकास कामे हाती घेतले आहेत. त्यानुसार अर्जुनी मोर. तालुक्यात सात जिल्हा परिषद क्षेत्राला सात जल रथ प्राप्त झाले आहेत.जि.प.सदस्यांनी सुचविल्याप्रमाणे संबधित ग्रामपंचायत च्या नावाने सदर जल रथाची आर.टी.ओ.पासिंग झाल्याची माहीती आहे. त्यानुसार नवेगावबांध क्षेत्राच्या जि.प.सदस्या रचनाताई गहाणे यांनी नवेगावबांध ग्रामपंचायतला, तर गोठणगावचे जि.प.सदस्य यशवंत गणवीर यांनी गोठणगाव ग्रामपंचायतला.तर बोंडगावदेवी चे जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांनी पिंपळगाव ग्रामपंचायतला, माहुरकुडा क्षेत्राच्या जि.प.सदस्या कविता कापगते यांनी माहुरकुडा ग्रामपंचायतला, तर केशोरी क्षेत्राचे जि.प.सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी केशोरी ग्रामपंचायतला जलरथ दिले.महागाव क्षेत्राच्या जि.प.सदस्या जयश्री देशमुख यांनी महागांव ग्रामपंचायतला तर ईटखेडा क्षेत्राच्या जि.प.सदस्या पोर्णिमा ढेंगे यांनी इसापुर ग्रामपंचायतला सदर जलरथ सुपूर्द केल्याची माहिती आहे. हा जलरथ संबधीत जि.प.क्षेत्रातील सर्वच गावातील लोक लाभ घेवु शकणार आहेत.ज्यांचेकडे छोटेमोठे कार्यक्रम होतात.किंवा सार्वजनिक कामासाठी या जलरथाचा उपयोग घेवु शकतात.जलरथ नेण्याची व आणण्याची जबाबदारी ही जलरथ नेणा-या लाभार्थ्याची राहणार आहे. देखभाल दुरुस्ती संबधीत ग्रामपंचायत पाहणार आहे.अर्जुनी मोर. तालुक्यातील सातही जिल्हा परिषद सदस्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला असुन या जलरथामुळे अनेकांच्या समस्या दुर होणार आहेत.पिंपळगाव ग्रामपंचायत ला जलरथ सुपूर्द करताना जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर, सरपंच विलास फुंडे, उपसरपंच निवृत्ता शेंडे, गौरीशंकर ब्राम्हणकर, प्रज्ञा डोंगरे, ग्रामसेवीका कावळे, दादाजी ब्राम्हणकर, प्रेम अग्रवाल, तथा इसापुर ग्रामपंचायत ला जलरथ सुपूर्द करताना जि.प.सदस्या पोर्णिमा ढेंगे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, सरपंच सरस्वता वलथरे, सर्व्हेश धांडे, प्रामुख्याने उपस्थित होते.