मुख्याध्यापकांने मुलांच्या हाताने केले नाली सफाईचे काम

0
10

गोंदिया,दि.29-गोंदिया पंचायत समिती अतंर्गत येणार्या कटंगी कला(मुले)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आज बुधवारला सकाळ पाळीच्या शाळेदरम्यान शाळकरी लहान मुलांच्या हाताने शाळेशेजारील रस्त्यावर नाली खोदण्याचे काम करुन तेथील माती बाहेर काढण्याचे काम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.कटंगी कला(मुले) येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत हे स्वत त्या मुलासमोर उभे राहून काम करवून घेत होते.याचे छायाचित्रण त्या गावातीलच एका युवकाने केले असता त्या युवकाला संबधित मुख्याध्यापकाने थांब तुला अर्धा तासात सांगतो कसे छायाचित्र काढतात असे म्हणून धमकावण्याचाही प्रकार केल्याची चर्चा गावात सुरु झाली आहे.दरम्यान याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती खुशबू जितेश टेंभरे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही असा प्रकार झाल्याची माहिती आली असून शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापती यांना याप्रकरणाची माहिती देणार असल्याचे सांगितले.मुलांच्या हातून नाली खोदकाम करवून घेणार्या मुख्याध्यापकावर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.