माडेकुतम येथे बिबट्याचा धुमाकूळ

0
11

गडचिरोली,दि.23- शहरापासून अवघ्या तीन किमीवर असलेल्या माडेतुकुम गावातील एका घरातम मंगळवारच्या रात्रीला बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली आहे. त्याला पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाला अपयश आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचे गावात ये-जा सुरू आहे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही आता पर्यंत वनविभागाला या बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही. आता बिबट्या गावात आल्याची माहिती कळताच गडचिरोली वन विभागाचे पथक आणि गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही आणला होता. मात्र, तब्बल तीन तासानंतर वनविभागाच्या पथकाला चकमा देऊन बिबट्या जंगलात पळाला.