17 जून ते 1 जुलै दरम्यान कृषि संजीवनी पंधरवाड्याचे आयोजन

0
53

          गोंदिया, दि.14 : डॉ.पंजाबराव देशमुख यांची 125 वी जयंती निमिताने 17 जून ते 1 जुलै 2024 या कालावधीत ‘कृषि संजीवनी पंधरवाडा’ आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्हाभरात प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन ‘कृषि संजीवनी पंधरवाडा’ साजरा करावयाचा आहे. त्यानुसार 17 जून- बीजप्रक्रिया जनजागृती, 18 जून- पीएम किसान उत्सव, 19 जून- जमीन सुपिकता जागृती, 20 जून- गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख, 21 जून- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 22 जून- पीक विमा जनजागृती, 23 जून- हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार, 24 जून- सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान, 25 जून- कापूस, भात व ऊस लागवड तंत्रज्ञान, 26 जून- तुर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान, 27 जून- कृषि महिला शेतकरी सन्मान, 28 जून- जिल्ह्यातील महित्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना, 29 जून- शेतकरी मासिक वाचन व वर्गणीदार वाढविणे, 30 जून- प्रगतशील शेतकरी संवाद व 1 जुलै रोजी कृषि दिन, अशाप्रकारे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

         1 जुलै रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी संपूर्ण महाराष्ट्रात कृषि दिन म्हणून साजरा केला जातो, त्या दिवशी कृषि संजीवनी मोहिमेची सांगता होणार आहे. सदर कालावधी हा खरीप पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत सदर मोहिमेद्वारे कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाचा प्रचार करणार आहेत. कृषि तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करु शकते. तरी या कृषि संजीवनी पंधरवाड्यात विविध मोहिमांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.