
.जिल्हाधिकारी यांनी स्वतः सायकल चालवत दिला सायकल चालवण्याचा संदेश…
गोंदिया :- शहरातील काही युवक युवतीने मिळून 18 जून 2017 ला दर रविवारी सायकल चालवण्याच्या संकल्प केला आणि त्याद्वारा ‘संडे सायकलिंग ग्रुप’ ची निर्मिती केली. आज अविरतपणे या ग्रुप द्वारे.. एक दिन सायकल के नाम ..असे ब्रीद वाक्य घेऊन सायकल चालवा.. पर्यावरण वाचवा.. आणि आरोग्य सुदृढ ठेवा ..हा संदेश देत सायकल चालवण्याच्या अभिनव उपक्रम सुरू ठेवला असुन आज या सायकलिंग संडे ग्रुपला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्त गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सुद्धा या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. आज 16 जून रविवारी सकाळी 6 वाजे रेलटोली गुरुद्वारा येथून या सायकलिंगला सुरवात करण्यात आली.गुरुद्वारा ते नागरा येथील शिव मंदिर पर्यंत व तिथून पुन्हा गोंदिया येथील विश्रामगृह पर्यंत सायकल चालविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सायकल चालवा.. पर्यावरण वाचवा.. आणि आरोग्य सुदृढ ठेवा ..हा संदेश दिला.या सायकलिंग संडे च्या वर्धापन दिना निमीत्त जिल्हाधिकारी तसेच सायकलिंग संडे ग्रुप चे अध्यक्ष मंजु कटरे, सचिव रवि सपाटे व कोषाध्यक्ष विजय येडे यांनी केक कापून वर्धापन दिन साजरा केला. सायकलिंग मध्ये गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सायाकलिंग संडेचे अध्यक्ष मंजु कटरे, सचिव रवि सपाटे, कोषाध्यक्ष विजय येडे, जितेंद्र खरवडे, अजित शेनमारे, 82 वर्षीय मुन्ना यादव, अरुण बंनाटे, दीपक गाडेकर, नवीन दहीकर, आर्यन कुंभलवार , हितेंद्र खरवडे, आशा तिडके, श्रद्धा यादव, दिपाली वाढई, त्रिवेणी उके, पुष्पा घोडेस्वार, भूमी खटवाणी, कृष्णा शेंडे, नरेंद्र बेलगे, साहिल खटवानी, प्रवीण हालानी, विजय सोनी, बीएच जिवानी, संदेश घरडे, कवल गुलाटी , हितेंद्र खरवडे, पियूष जैन, सत्यवीरसिंग बीसेन, ओम हरिणखेडे, निर्वाण सर, कनक सेलारे, व हिरवळ ग्रुप मधील विक्की शहारे, इत्यादी लोकांनी सायकलिंग मध्ये सहभाग घेतला.