* संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणीला सुरुवात
* दर्रेकसा, सावली, देवलगांव, सिलेझरीसह डव्वा ग्रामपंचायतींची केली तपासणी
गोंदिया – आपले गाव स्वच्छ व सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटत तरी त्याची सुरुवात ही दुसऱ्याने करावी, अशी अपेक्षा बहुतांश नागरिकांची असते. मात्र ज्यांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला त्याला सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. गावं विकासासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी केले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा अन्वये जिल्हास्तरीय तपासणीच्या अनुषंगाने सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायत दर्रेकसा, देवरी तालुक्यातील सावली, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगांव, सिलेझरी तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या वतीने दिनांक 19 जून रोजी तपासणी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हास्तरीय तपासणी समिती अध्यक्ष म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, समिती सदस्य सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आनंदराव पिंगळे, समिती सदस्य प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण नरेश सोनटक्के, आरोग्य विभागाचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, स्वच्छ भारत मिशन जिल्हा कक्षाचे शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार भागचंद्र रहांगडाले , शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी गटशिक्षणाधिकारी सालेकसा डोंगरे, गटशिक्षणाधिकारी अर्जुनी मोरगाव चव्हाण, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रतिनिधी अंकीत अग्रवाल, यांचेसह देवरीचे गटविकास अधिकारी गिरिधर सिंगणजुडे, अर्जुनी मोरगाव चे गटविकास अधिकारी वैद्य, सडक अर्जुनी चे गटविकास अधिकारी सानप, सालेकसा विस्तार अधिकारी पराते, गावड, देवरी विस्तार अधिकारी झामरे, अर्जुनी मोरगाव विस्तार अधिकारी राणे, मोरेश्वर धोंगडे, सडक अर्जुनी विस्तार अधिकारी पटले, यांचेसह BRC महेश वाढई, भीमराज पारधी, सुरेश पटले, राधेश्याम राऊत, वॉश अभियंता बिसेन उपस्थित होते.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2023-24 अंतर्गत 53 जिल्हापरिषद गटातून प्रथम आलेल्या 53 ग्रामपंचायतीमधून गुनानुक्रमे 9 ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यात सालेकसा तालुक्यातील दर्रेकसा, देवरी तालुक्यातील सावली, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगांव, सिलेझरी, सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा, गोरेगांव तालुक्यातील तुमखेडा बु., आमगाव तालुक्यातील शिवनी, गोंदिया तालुक्यातील गंगाझरी तसेच तिरोडा तालुक्यातील नहरटोला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तपासणी दरम्यान पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, गाव परिसर स्वच्छता आदी घटकांची तपासणी करण्यात आली.
शाळा व आंगणवाडी मधील शौचालय स्थिती, पिण्याच्या पाण्याची सोय, परिसर स्वच्छता या घटकांच्या अनुषंगाने तपासणी करून मूल्यांकन करण्यात आले.