गोंदिया, दि.23 : आजच्या धकाधकीच्या कठीण परिस्थितीत समाजातील अनेक दानशुर व्यक्ती/संस्था पुढे येऊन सढळ हाताने रुग्णवाहितासाठी दान करीत आहेत. अशीच दानशुर संस्था स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा गोंदिया कडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे 5 नग व्हील चेअर प्राप्त झालेले आहे. सदर व्हील चेअरचा लाभ हा बाह्यरुग्णालयातील रुग्ण व वार्डात भरती असणाऱ्या गोरगरीब रुग्णांकरीता होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया ही अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिगंबर मरस्कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली व समाजसेवा विभागाच्या पुढाकाराने वरिष्ठ समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांच्या समन्वयातून भूमिका पार पडली.
सदर कार्यक्रमास भारतीय स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक संजय कवरेकर, सीएमआरबी धर्मेंद्र निमजे, बँक व्यवस्थापक श्री.अरविंदकुमार, एसआरए विजयकुमार ढवरे तसेच संस्थेतील समिती सदस्य प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.प्रशांत बागडे, डॉ.विपुल अंबादे, डॉ.दिपक रुपारेल, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, प्रशासकीय अधिकारी निमा चौधरी तसेच समाजसेवा विभागातील समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय भुषण खांडेकर, गोपाली खोटे, दिलीप दगडकर आणि संस्थेतील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यातील व लगतच्या राज्यातील दानशुर व्यक्ती/संस्था यांनी सढळ हाताने रुग्णवाहीतासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. दान दात्यांना किंवा संस्थांना दान करायचे असल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदियाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा गोंदिया येथील खाते क्रमांक 42729219886, IFSC Code SBIN0000376 येथे पैसे अथवा वस्तू स्वरुपात दान करता येईल. आपण केलेल्या दानाची पावती 80G अंतर्गत आयकर सुटीस पात्र आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदियाच्या वतीने अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांनी दानशुर व्यक्ती/संस्थांना रुग्ण हिताच्या दृष्टीने दान करण्याचे आवाहन केले आहे.
याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे व स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक संजय कवरेकर यांनी कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार समाजसेवा विभागाचे वरिष्ठ समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांनी मानले.