अर्जुनी मोर.दि.२१ः- तालुक्यातील नवेगाव बांध परिसरात मागील आठ दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रोवणी झालेल्या भात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने या नुकसानीचे पंंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यानी केली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात तलाव व नाले असल्यामुळे मागील चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यांना आलेला पूर व तलावांच्या सांडव्यातून निघणारा पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नवेगाव बांध परिसरातील सावरटोला, बोरटोला ,चापटी ,मुंगली नवेगावबांध , देवलगाव ,सुरगाव, बोंडे, सिरेगाव,भीवखिडकी, बीड टोला,बुरशी टोला, सोमलपुर, कवठा, डोंगरगाव, बाराभाटी ,बोळदे,गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे, तरी परिसरातील परिस्थितीची त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केलेली आहे.





