24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ पिंपळगाव/खांबी येथे तलावात बुडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

पिंपळगाव/खांबी येथे तलावात बुडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

0
731

अर्जुनी मोर,दि.२१-तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे, तालुक्यातील अनेक छोटे मोठे नाले दुथडी भरून वाहत  असून पिंपळगांव/खांबी येथील सावरटोला रोडवरील महादेव बोळीत आंघोळीला गेलेला एका दहा वर्षिय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.  आज २१ जुर्ले रोजी रजनीश वामन शिवणकर शाळेत जाऊन गुरुपूजा करुन परत घरी आला.त्यानंतर सकाळी १०:३० वाजे दरम्यान पिंपळगांव येथील तिन मुलासोबंत आंघोळ करायला गेला असता आंघोळ करतांना पाण्यामध्ये पोहता न आल्याने महादेव बोळी याठिकाणी रजनीश वामन शिवनकर हा १० वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला. सोबत त्याचा मोठा भाऊ व एक मित्र होता.पाण्यामध्ये बुडतांना पाहिल्यानंतर सोबत असलेला मोठा भाऊ गावामध्ये सांगायला आला.त्यानंतर ठिकाणी गावातील लोकांची गर्दी झाली. लगेच त्याला पाण्याबाहेर काढून ग्रामीण अर्जुनी मोर पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार कमलेश सोनटक्के यांंनी घटनास्थळ गााठून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता हलविले.शवविच्छेदनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करून पिंपळगाव येथे त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या दुर्देवी मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे.पो.नि.सोनटक्के यांचे मार्गदर्शनात बिट अंमलदार कोडापे करीत आहेत.