25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाल यांनी पाठवले निवेदन

सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाल यांनी पाठवले निवेदन

0
46

सावली,दि.२६ः-गेल्या काही दिवसापासून सातत्याने तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीच्या पिकांचे व घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. पिक विम्यापासुन वंचीत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे, पुर्नगठीत कर्ज धारक शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणेसह आदी मागण्या घेऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी शेतकर्यांना त्वरीत मदत देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात सावली तालुक्यात सतत 5-6 दिवसापासुनच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झालेले आहे. त्याचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी.शेतकऱ्यांना पूरपरिस्थितीत त्यांच्या धान, तूर, कापूस ईत्यादी पिकांचे नुकसान झाल्याने दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर आल्याने त्यांना दुबार पेरणीसाठी मदत जाहीर करावी.तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवक यांनी मुख्यालयी हजर राहून पूरपरिस्थितीत आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे दृष्टीने प्रशासनास सुचना द्याव्या. सावली तालुक्यातील कर्जमाफीपासुन वंचीत शेतकऱ्यांचे सन 2013-14 व 2014-15 पासून पूर्नगठीत कर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावी. तालुक्यातील प्रधानमंत्री पिक विमा 28602 लाभार्थ्यांनी काढला आहे. त्यापैकी 7637 शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार पिक विमा कंपनीकडे व प्रशासनाकडे केलेली होती. त्या अनुषंगाने विमा कंपनीने सर्व्हे करुन 7637 लोकांचा विमा मंजूर करण्यात आला. त्यापैकी 2533 शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून विम्याची रक्कम भरपाई अदा करण्यात आली परंतू उर्वरीत 5104 शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्याअनुषंगाने उचीत कार्यवाही करुन रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी.तालुक्यात हिस्त्र प्राण्यांचा वावर जास्त असल्याने वाघाची, बिबट्याची व रानडुकराच्या शेतकऱ्यावर हल्याचे प्रमाण वाढत असल्याने याचा बंदोबस्त करण्यात यावा.तालुक्यातील पुराणे अनेक रस्ते खराब झाल्याने दुरुस्ती करण्यात यावे. असे अनेक मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सुधीर मुनगंटीवार मंत्री वने -सांस्कृतिक कार्य व मत्स्यववसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा,धनंजय मुंडे कृषिमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.