अर्जुनी मोरगांव,दि.२७ः तालुक्यातील कोरंभी व अरततोंडी येथील अतिक्रमण धारकांवर ग्रामपंचायतीच्यावतीने होणाऱ्या अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडी वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करुन तहसिलदारांना निवेदन सादर करुन न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
कोरंभी त.सा.कं. १९ येथील गट नं. ८४,७५,५५, ११५ अतिक्रमणधारक सन १९७२-७३ पासून अतिक्रमण शेती करुन कुटूंबाचे पालन पोषण करत असतांना ग्रा.पं. कोरंभी च्यावतीने सार्वजनिक ग्रा.पं. मालकीच्या आबादी गट ८४ जागेत धान पेरणी करुन नये म्हणून ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम ५३ नुसार अतिक्रमण हटविण्यात यावे अतिक्रमणधारक शेतकर्यांना नोटीस दिले.तसेच अतिक्रमण हटविले नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे नोटिसात म्हटले आहे.एक वर्षापासून अतिक्रमण दूर करण्याविषयी मोजक्याच लोकांना नोटीस देवून कायद्याची दमदाटी देण्यात येत आहे. अशातच सार्वजनीक जागेत गावातील अनेक श्रीमंत लोकांची अतिक्रमण काढण्याविषयी कोणत्याच प्रकारचे नोटीस त्यांना ग्रामपंचायत देत नाही.मोजक्याच लोकांना अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई पक्षपातीपणाने केली जाते आहे.त्यामुळे गट नं. ८४ ही जागा निश्वित कुणाकडे आहे, याची मालकी अधिकार कुणाकडे हे निश्चित करुनच ज्या विभागाकडे आहे. त्या विभागाकडून कारवाई करण्यात यावी.सार्वजनीक जागेत इतर लोकांनी केलेले अतिक्रमण हटविले जात नाही, तोपर्यंत आम्हाला सुद्धा हटवण्यात येवू नये या मागणीचे निवेदन अतिक्रमणधारकांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव सलामे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण धारकावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय अर्जुनी मोरगांव समोर निवेदन दिले.यावेळी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी किशोर तागडे, दिनेश पंचभाई, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुखदेव मेश्राम, सडक अर्जुनी युवा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पुरूषोत्तम रामटेके, गुरुदेव राऊत तसेच प्रामुख्याने अतिक्रमणधारक शेतकरी उपस्थित होते.





