24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ आमगाव तालुका आरोग्य विषयक आढावा सभा

आमगाव तालुका आरोग्य विषयक आढावा सभा

0
61

आमगाव- तालुकास्तरीय आरोग्य विषयक आढावा सभा पंचायत समिती सभागृह येथे संपन्न झाली.आढावा सभेप्रसंगी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत, खंड विकास अधिकारी गिरीपुंजे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या उपस्थितीत आरोग्य विषयक कामाचा आढावा घेण्यात आला.आढावा सभेत डॉ.रोशन राऊत यांनी आरोग्य संस्थेतील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी संस्थात्मक प्रसुती वाढविणे, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजना यांची प्रभाविपणे अंमलबजावणी करुन कार्यक्रम व योजना गावपातळीतील शेवटच्या टोकापर्यॅत जनमानसात पोहचविण्याच्या सुचना दिल्या.
दि.26 जुलै रोजी तालुकास्तरीय आरोग्य अधिकारी/कर्मचारी यांचे एचएमआयएस पोर्टल डाटा एन्ट्री प्रशिक्षण,संशयित पोलिओ रुग्ण शोध मोहीम, माता व बाल संगोपन कार्यक्रम,सर्पदंश उपचार व प्रतिबंध,वात्सल्य कार्यक्रम,किलकारी, प्रधानमंत्री मातृवंदन योजना,अंसासर्गिक आजार निंयत्रण कार्यक्रम,नियमित लसीकरण,साथरोग,अँनिमिया मुक्त भारत अभियान,संस्थात्मक प्रसुती,नियमित लसीकरण,कुपोषण,नवसंजीवनी योजना,स्टॉप डायरीया मोहिम,आयुष्मान भारत जनआरोग्य कार्यक्रम इ.विविध विषयांचा आढावा व मार्गदर्शन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी केले.क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा व मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी केले.कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा डॉ.भाग्यश्री गावंडे यांनी घेतला.किटकजन्य कार्यक्रमाची माहीती सादरीकरण जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी केले.प्रधानमंत्री मातृवंदन योजनेबाबत समन्वयक कैलाश खांडेकर यांनी घेतला.अंसासर्गिक आजार निंयत्रण कार्यक्रम बाबत मार्गदर्शन कार्यक्रम समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांनी घेतला.सिकलसेल व रुग्ण कल्याण समिती बाबत माहिती समन्वयक स्वप्ना खंडाईत यांनी घेतला.
आढावा सभेत चारही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,औषध निर्माण अधिकारी,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा गट प्रवर्तक उपस्थित होते.