25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ पुनर्वसित रामाटोला येथे सोयी सुविधा तातडीने पुरवा- आ.रहांगडाले

पुनर्वसित रामाटोला येथे सोयी सुविधा तातडीने पुरवा- आ.रहांगडाले

0
152

तिरोडा:- तालुक्यात अदानी पॉवर महा.लिमिटेड मध्ये सन २०१३-१३ मध्ये रामाटोला गावाचे पुनर्वसन करण्यात आले. सदर गावामध्ये अदानी समुहातर्फे सोयी सुविधांचा अभाव असल्याची तक्रार ग्रामवासियांनी आमदार विजय रहांगडाले यांचेकडे केलीअसता तातडीने रामाटोला येथे बैठक बोलाविली. यामध्ये प्रामुख्याने गावामध्ये मुलभूत सुविधामध्ये रोड रस्ते व नाल्याची समस्या, जलजीवन मिशनअंतर्गत गावातील प्रत्येक घरापर्यंत नळाची सुविधा पुरविण्यात यावे, गावतलावाचे पाणी गावामध्ये येत आहे त्याची सुविधा करण्यात यावी, शाळेत विद्यार्थ्याना किचन शेड बांधकाम करण्यात यावे, शुद्ध पाण्याची सुविधा पुरविण्यात यावी, पुनर्वसित नागरिकांना मिळालेले पट्टे / जागा विकण्याची परवानगी देण्यात यावी, रामाटोलावाशीयांना रामाटोला येथे रेशन वाटप करण्यात यावे, गाव पातळीवर पूर्ववसन समिती स्थापन करण्यात यावी, बेरोजगारांना रोजगाराकरिता व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावे आदी समस्या ग्रामवासियांनी मांडल्या.या सर्व समस्या मार्गी लावण्याकरिता आमदार  रहागंडाले यांनी जिल्हाधिकारी तसेच अदानी समूहासोबत बैठक बोलावून मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर गावातील रस्त्याची पाहणी सुद्धा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी, जी.प.सदस्या माधुरी रहांगडाले, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, काचेवानी सरपंच जयश्री गुनेरीया, मेंदीपूर सरपंच धर्मदास चौधरी,शिवदास पारधी, सदस्य संतोष चौधरी, अदाणी समुहाचे प्रमुख विमुल पटेल, पप्पू सय्यद, संजय गुनेरीया, व गावकरी उपस्थित होते.