24 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ भोयर,पवार समाजाची केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये दुरुस्तीची मागणी लवकरच पूर्ण होणार

भोयर,पवार समाजाची केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये दुरुस्तीची मागणी लवकरच पूर्ण होणार

0
890

नागपूर,दि.२८ः-समाजाची प्रलंबित मागणी असून केंद्र शासनाच्या क्लीरिकल चुकी मुळे भोयर आणि पवार मधील असलेला कॉमा (,) सुधारित राजपत्रा मध्ये नसल्याने भोयरपवार ही एकत्र जात दर्शविल्या गेली, जी जात अस्तित्वात नाही, भोयर पवार कॉमा इन्शर्ट करण्याकरिता पवार मिशन कार्य करीत आहे. दि.26 जुर्ले रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांची सुनावणी सह्यांद्री अतिथी गृह मुंबई येथे राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग, न्यू दिल्ली, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे,इतर मागासवर्ग मंत्रालय, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, मुंबई यांचे माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 19 ओबीसी जात समुदाय यांनी आयोग समक्ष सुनावणी पार पडली. या सर्व जातींना राज्यात आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.परंतु केंद्र शासन मध्ये सुविधा नाही.करिता केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या सुचनेनुसार ही सुनावणी घेण्यात आली. ज्यामध्ये भोयर पवार समाजाचे प्रतिनिधीनी उपस्थित राहून आयोगानीं विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.जी माहिती विचारली ती संपूर्ण कागदपत्रसह देण्यात आली. चर्चे दरम्यान जस्टीस रोहिणी आयोगाला निवेदन बाबत विचारण्यात आले.आपल्या प्रतिनिधीनी लगेच आयोगातर्फे मिळालेली पोच पावती सबमिट केली.
आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आपल्या प्रकरणावर लवकरच निर्णय देऊ असे आश्वासन दिले.त्यामुळे लवकरच आपल्याला न्याय मिळणार असून या सुनावनीला डॉ. नामदेव राऊत,भगवान बन्नगरे,श्रावण फरकाडे,मधुकर चोपडे,मोरेश्वरजी भादे उपस्थित होते.