तिरोडा :- तालुक्याती अनेक गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुसर्या ठिकाणी जात असतात. यासाठी एसटी बसने विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू असतो. परंतु, तिरोडा-साकोली मार्गावर प्रवास करताना विद्यार्थ्यांना एसटी बसच्या चालक, वाहकांच्या अरेरावीचा सामना करावा लागतो. यामुळे बिरसी, लाखेगाव, खोडगाव, बोपेसर येथील शिक्षण घेणार्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब योग्य नसून विद्यार्थी-विद्यार्थिनींशी होत असलेली गैरवर्तवणुक मुळीच खपवून घेणार, असा इशारा आ.विजय रहांगडाले यांनी आगाराच्या अधिकारी, कर्मचार्यांना दिला आहे.