अर्जुनी मोर. -महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील ई पाॅस मशीनद्वारे धान्य वितरण करतांना येणा-या अडचणीच्या संदर्भांत आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात.याबाबत अर्जुनी मोर. तालुक्यातील प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनी 30 जुलै रोजी मान.जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देवुन 5 ऑगस्ट पर्यंत वितरण प्रणालीत सुधारणा करावी,अन्यथा ई पाॅस मशीन तहशील कार्यालयात जमा करण्याचा ईशारा दिला होता.मात्र कुठलीच कार्यवाही न झाल्याने अखेर संघटनेच्या वतीने आज 5 ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व राशन दुकानदारांनी ई पाॅस मशीन तहशील कार्यालयात केली जमा करून तहसिलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन दिले.25 जुलै 2024 रोजी माननीय प्रधान सचिव यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर कोणताही समाधानकारक तोडगा व निश्चित आश्वासन न निघाल्याने महासंघाला अत्यंत नाईलाजाणे हा निर्णय घेणे भाग पडत आहे.31 जुलै 2024 पर्यंत शासनाकडून या ई पास मशीनच्या संदर्भात ठोस निर्णय तसेच आवश्यक उपाययोजना न झाल्यास राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार जुलै महिन्याचे धान्य वितरण बंद झाल्यानंतर दिनांक पाच ऑगस्ट 2024 रोजी आपले ई-पास मशीन आपापल्या तहसील कार्यालयात जमा करतील असा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार अर्जुनी मोरगाव तालुका प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व राशन दुकानदारांनी ही पास मशीन तहसीलदाराकडे सोपवून निवेदनही दिले. इंटरनेट सेवा सर्वर मुळे धान्य वाटपात खूप अडचणी येत आहेत. ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपास मंजुरी द्यावी, महागाई इष्टांगानुसार तिनशे रुपये क्विंटल कमिशन व केवायसी मोबदला पन्नास रुपये प्रति व्यक्ती द्यावा व इतर मागण्या बाबत 30 जुलैला तहसीलदार अर्जुनी मोरमार्फत शासनाकडे निवेदन देण्यात आले होते.