लाडकी बहीण योजनचे अर्ज १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा-आमदार विनोद अग्रवाल

0
2353

गोंदिया,दि.१०ः-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समाजातील सर्व घटकांसाठी आहे. योजनेतून एकही पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी गावस्तरावर ग्राम समितीने आणि शहरात वॉर्ड समितीने घ्यावी, ऑफलाईल शिल्लक अर्ज 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करावे, असे आवाहन गोंदिया विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.ते शनिवार 10 ऑगस्ट रोजी पंचायत समितीच्या सभापती कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अग्रवाल पुढे म्हणाले, महिलांना आत्मनिर्भर बनविने, सक्षमीकरण आणि आर्थिक विकासासाठी ही योजना महत्त्वाची आहे. योजनेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेने योजनेच्या अंमलबजावणीचे काम उत्तमपणे केल्याने जिल्हा व गोंदिया तालुका राज्यात अव्वल असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. श्हरासह गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वे करून सर्व पात्र बहिणींना योजनेचा लाभ देण्याचे निर्देश यावेळी अग्रवाल यांनी उपस्थितीत समिती पदाधिकार्यांना दिले. गोंदिया जिल्हा योजनेच्या नोंदणीत उत्कृष्ठ कार्याची पावती आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 82782 अर्ज नोंदणी झाले. आतापर्यंत 80636 अर्ज पात्र ठरले आहेत. यात शहराचे प्रमाण कमी आहे. 1344 अर्ज पात्रतेच्या प्रक्रियेत आहेत. शिल्लक अर्ज ऑनलाईन करण्यासाठी सोमवारी नविन पोर्टन कार्यान्वित होत आहे. त्यामुळे योजनेची अर्ज प्रक्रिया ही सुलभ होणार आहे. ज्यांनी अर्ज केला नसेल त्या भगिणींनी काळजी करू नये 31 तारखेपर्यंत अर्ज करावा, त्यांनाही जुलै, ऑगस्टचा हप्ता दिला जाईल. लक्ष्याच्या जवळ पोहचलो आहोत. यंत्रणेने जोमाने कार्य करून लक्ष पुर्ण करावे. सर्व समाजातील महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रवाल यांनी केले. यावेळी तालुका समितीचे सदस्य पंस सभापती मुनेश राहंगडाले, उपसभापती नीरज उपवंशी, सदस्य कीर्ति पटले, विनीत सहारे, तहसीलदार शमशेर पठाण, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी राणे, बालविकास प्रकल्प अधिकारी सोनटक्के उपस्थित होते.