रामाटोलावासीयांच्या समस्या तातडीने मार्गी लावा- आ.विजय रहांगडाले

0
383

तिरोडा:-तालुक्यात अदानी पॉवर महा.लिमिटेड मध्ये सन २०१२-१३ मध्ये रामाटोला गावाचे पुनर्वसन करण्यात आले असून सदर गावामध्ये अदानी समुहातर्फे सोयी सुविधांचा अभाव असल्याबाबतची तक्रार ग्रामवासियांनी क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचेकडे केली होती.त्या तक्रारीच्या आधारावर जिल्हाधिकारी यांचेसोबत बैठक आयोजित करुन प्रामुख्याने गावातील मुलभूत सुविधामध्ये रोड रस्ते व नाल्याची समस्या, जलजीवन मिशनअंतर्गत गावातील प्रत्येक घरापर्यंत नळाची सुविधा पुरविण्यात यावी, शुद्ध पाण्याची सुविधा पुरविण्यात यावी, पुनर्वसित नागरिकांना मिळालेले पट्टे / जागा विकण्याची परवानगी देण्यात यावी, रामाटोलावाशीयांना रामाटोला येथे रेशन वाटप करण्यात यावे, बेरोजगारांना रोजगाराकरिता व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावे आदी समस्या ग्रामवासियांनी मांडल्या असता या सर्व समस्या मार्गी लावण्याबाबत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आदेश दिले. या बैठकीममध्ये प्रामुख्याने, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार गजानन कोकडे,जि.प.सदस्य पवन पटले, शैलेश नंदेश्वर, संजय बैस, प.स.सदस्य अजाबराव रीनाईत काचेवानी सरपंच जयश्री गुनेरीया, मेंदीपूर सरपंच धर्मदास चौधरी, मा.सरपंच शिवदास पारधी, सदस्य संतोष चौधरी, अदाणी समुहाचे प्रमुख पियुष दिगावकर, विमुल पटेल, व गावकरी उपस्थित होते.