मतदार यादी निरीक्षक विभागीय आयुक्त १२ ऑगस्टला गोंदिया जिल्हा दौऱ्यावर

0
31

गोंदिया : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 01.07.2024 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला असून भारत निवडणूक आयोग यांचे पत्र 26 जुन, 2024 नुसार विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर यांची मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्ती केली आहे.

         त्यानुसार 01.07.2024 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) अंतर्गत मतदार यादी तपासणीच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) म्हणून भेट दयावयाच्या असल्याने 12/08/2024 (सोमवार) रोजी दुपारी 4.45 वाजता प्रथम भेटीबाबत श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर हे गोंदिया जिल्हयात येणार आहेत.

          श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर यांचा भ्रमनध्वनी क्र. 8983019814 हा सर्व जनतेसाठी कळविण्यात येत आहे. सबब, मतदार यादीच्या तपासणी च्या अनुषंगाने 12/08/2024 (सोमवार) रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे दुपारी 4.45 वाजता श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर हया प्रथम भेटीबाबत आढावा घेण्यार असून बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर, खासदार, आमदार, मान्यता प्राप्त राजकीय पक्ष व जिल्हयातील उपविभागीय अधिकारी (सर्व), तहसिलदार (सर्व) उपस्थित रहाणार आहेत.