दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

0
1063

गोंदिया,दि.१३- तालुक्यातील दासगाव (खुर्द) येथे दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.आलोक भागचंद बिसेन वर्ग तिसरा व प्रिन्स किशोर रहांगडाले वर्ग तिसरा असे या विद्यार्थ्यांचे नाव असून ते जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळा दासगाव खुर्द येथील विद्यार्थी होते. दुपारी जेवण झाल्यानंतर ते बाहेर फिरायला गेले असता ते परत आले नाही. संध्याकाळी त्यांच्या पालकांनी शोध घेतला असता शाळेजवळील मुरुमाच्या खड्ड्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.घटनास्थळी रावणवाडी पोलीस दाखल झाले आहेत.