गोंदिया,दि.१४ः- तालुक्यातील बाजार चौक नवेगाव धापेवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष पदाधिकारी व भव्य कार्यकर्ता मेळावा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी बोलतांना खासदार पटेल यांनी महायुतीच्या सरकारमध्ये विकासाचे नवे पर्व सुरु झाल्याचे सांगितले.तसेच भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारे सण रक्षाबंधनाच्या शुभ पर्वावर परिसरातील अनेक महिलांनी प्रफुल पटेल यांना तिलक व ओवाळणी करून राखी बांधली.
पटेल पुढे म्हणाले की, माता- बहिणींना अधिक सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी आमच्या सरकारने माझी लाडकी बहिण योजना लागू केली आहे. माझ्या भगिनींना निःशुल्क उच्च शिक्षण देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याची आमच्या सरकारने संकल्प केला आहे. महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मुक्त देण्यात येणार आहे. सरकार शेतकऱ्यांना कृषीची वीज मोफत, युवा प्रशिक्षण च्या माध्यमातून विकासाचे नविन पर्व सुरु झाले आहे.
श्री पटेल पुढे म्हणाले की नवेगाव व आजूबाजूच्या परिसरात खळबंदा जलाशयाचे पाणी मिळून शेतकऱ्यांना अनेक पिके घेता येतात. धान उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी 20 हजार बोनस देण्याचे काम आमच्या सरकारने केले. शेतकरी, महिला, युवा याचे भविष्य उज्ज्वल करण्यास सरकार कटिबध्द आहे.
मेळाव्याला खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, कुंदन भाऊ कटारे, गणेश बरडे, केतन तुरकर, रजनी गौतम, घनश्याम मस्करे, रवी पटले, निरज उपवांशी, शंकरलाल टेंभरे, आरजू मेश्राम, उर्मिला लांजेवार, मोहन पटले, मदन चीखलोंडे, प्रकाश पटले, कृष्ण कुमार जयस्वाल, प्रदीप रोकडे, रीना रोकडे, कल्लू मास्करे, सुनील पटले, शैलेश वासनिक, भागेश बिजेवार, योगेश पतेह, मुन्ना चौरागडे,पूजा उपवंशी, सदानंद बिरनवार, गेंदलाल ठाकरे, कान्हा बघेले, योगेश कसरे, आशिष बंसोड, तुळशिकुमार बघेले, मस्करेताई, धर्मराज राणे, पदमभाऊ चौरीवार, भोजराज रहांगडाले, धर्मराज कटरे, नितिन नागपुरे, गोविंद लीचडे, मनोहर पटले, रवि कावरे, कमलेश दमाहे, लोपचंद लांजेवार, प्रफुल उके, मुन्ना लांजेवार, उमेश खरोले, छोटू तुरकर, यश जयस्वाल, दिलिप बेंदवार, अमर डहाके, राजु चौरागडे, बहादूर भलावी, मिथुन टेकाम, भाऊलला पटले, द्वारका साठवणे, कपूर कूंजाम, अजय बिसेण, सुषमा बिजेवार, शोभा चौरीवार, अनिता बीजेवार, गणेश दुधपाच, सूरेश चौधरी, आकाश लांजेवार, रमेश धुवारे, उमेश खरोले, संजय बररया सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.