Bsc Agriculture आणि Dairy Technology चे शासकीय महाविद्यालय पवनीला देण्यात यावे

0
90
Oplus_0
वाढदिवसाच्या शुभेच्छा

: डोन्ट वरी ग्रुप ची पालकमंत्री गावीत यांना मागणी
पवनी : आदिवासी विकास मंत्री, आणि भंडारा जिल्हा चे पालकमंत्री विजयकुमार गावीत पवनी येथे शासकीय दौऱ्यावर असताना डोन्ट वरी ग्रुप, पवनी च्या पदाधिकाऱ्यांनी भेटून  Bsc Agriculture आणि Dairy Technology चे शासकीय महाविद्यालय पवनी ला देण्यात यावे अशी मागणी केली.
 पवनी ऐतिहासीक शहर असून या शहराला विदर्भाची काशी म्हणून देखील महाराष्ट्रात ओळखले जाते, ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरात व तालुक्यात एकही शासकीय महावि‌द्यालय नाही. पवनी तालुक्यात इंदिरा सागर प्रकल्प (गोसे) धरण असून या परिसरात पारंपारीक शेती मोठ्या प्रमाणात केली जाते (तीन फसल) आणि दुग्ध उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. या दोन महत्त्वाच्या व्यवसायांना घेऊन तालुक्यात पुन्हा संशोधन होऊन, उत्पादन वाढीसाठी जर शासकीय महावि‌द्यालय स्थापन झाले तर या भागात या दोन्ही व्यवसायांना चांगले दिवस येतील, नवे संशोधन होऊन गुणवत्ता वाढेल, उत्पादन वाढून नवीन प्रक्रिया आधारित व्यवसाय सुरू होतील. त्या साठी असलेले BSC Agriculture आणि College of Dairy Technology चे शासकीय महावि‌द्यालय या भागात सुरू करण्यात यावे अशी मागणी केली.मागणीला पालकमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी डोन्ट वरी ग्रुप पवनी चे सहसंयोजक संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, सचिव निशांत नंदनवार व  निखिल शहारे, आदित्य दाडवे उपस्थित होते.