गोंदिया – गोंदिया तालुक्यातील दासगाव खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्या मृतक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर पवार बोर्डिंग कन्हार टोली गोंदिया येथे पवार प्रगतिशील मंचचे पदाधिकारी व इतर समाज बांधवांच्या उपस्थितीत मृतक बालकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेले आलोक भागचंद बिसेन तसेच तसेच प्रिन्स किशोर रहांगडाले यांचा शाळेच्या जवळ असलेल्या मुरुमाच्या खाणीत पडून मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट रोजी पवार बोर्डिंग गोंदिया येथे ध्वजारोहण झाल्यानंतर सदर मृतक बालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी राजकुमार (पप्पू)पटले यांनी शब्दसुमनाने श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही मृतक बालकांच्या दुःखात सर्व समाज सहभागी असून समाजाच्या वतीने आर्थिक मदत देण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
यावेळी पवार प्रगतिशील मंचचे अध्यक्ष ॲड. पी. सी. चव्हाण, उपाध्यक्ष पन्नालाल ठाकरे, सचिव प्रिती देशमुख, प्रगतिशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, सचिव किशोर भगत, डॉ. कैलाशचंद्र हरिणखेडे, डॉ.प्रशांत कटरे, राष्ट्रीय पवार महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे, गुलाब बोपचे, डॉ. संजीव रहांगडाले, प्रा.संजय रहांगडाले, राजेश चव्हाण, भालचंद्र ठाकूर, संचालक महेंद्र बिसेन, पंकज पटेल, दिलीप पारधी, भागचंद्र रहांगडाले, शिक्षण संस्थेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, छत्रपाल चौधरी, ओमप्रकाश बिसेन, दिपंम देशमुख, कुर्मराज चव्हाण, हेमंत बघेले, बंटी बोपचे, अनिल रहांगडाले, योगी येडे यांच्यासह महिला संघटनेच्या अध्यक्ष ्धनिषा कटरे, रश्मी रहांगडाले, दुर्गा संजय ठाकरे, सोनाली रहांगडाले, चेतना चव्हाण, मैथूला बिसेन,दयावती येळे, सविता तुरकर, शीतल रहांगडाले आदी उपस्थित होते.