गोंदिया- जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशनच्या (Police Station)वतीने आदीवासी बहुल व दुर्गम भागातील युवकांना पोलीस भरती मध्ये सहभागी होण्यासाठी सदर युवक-युवतींना स्पर्धा परिक्षा,भरतीपुर्व सराव तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई नितीन डुंबरे यांनी सन 2016 पासुन विद्यार्थांना धडे देण्यास सुरुवात केली.ते मागील 8 वर्षापासुन विद्यार्थांना नि:शुल्क प्रशिक्षण (Free training) देत आहेत.त्यामुळे या भागातील युवक-युवतींना मोठी मदत होत आहे.
त्यांनी दिलेल्या प्रशिक्षण धड्याचे युवक-युवतींनी पुरेपुर लाभ घेतला आणि शासनाच्या गृह विभागाच्या पोलीस दलात निवड झाले.निवड झालेल्यांमध्ये कु.रजत अशोक चौधरी रा.कोहमारा,ता.सडक/अर्जुनी, कु.प्रियंका टीकाराम ताराम रा.शिवनी/चांदागड ता.कुरखेडा/गडचिरोली, कु.दयावंता वामन आळे,रा.रावनवाडी/कोरेगाव ता.वडसा जि.गडचिरोली कु.सुरज मडावी रा.आंभोरा/केशोरी,कु.निखिल नेवारे रा.केशोरी ता.अर्जुनी/मोरगाव जि.गोंदिया यांचे स्वातंत्र्य दिनी केशोरी पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आय.आर.बी चे पोलीस निरीक्षक श्री.सोनटक्के,केशोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, पो.ह.सुशील रामटेके,प्रशिक्षक तथा पोलीस शिपाई नितीन डुंबरे तसेच विद्यार्थांचे पालक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.