एस.एस.जे.महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान

0
78

अर्जुनी मोरगाव –स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सहा. निवडणूक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कार्यालय अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाली असतील किंवा पूर्ण होणार असतील अश्या सर्व विद्यार्थ्यांकडून मतदान नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. ईश्वर मोहूर्ले, उपविभागीय अधिकारी मा. वरूणकुमार शहारे, तहसीलदार  अनिरुद्ध कांबळे, नायब तहसीलदार विनोदकुमार पेंदाम, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष कावळे, प्रशांत कोल्हटकर, महाविद्यालयातील कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
भारतीय लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे गरजेचे आहे, त्याकरिता आपण मतदार यादीत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. ईश्वर मोहूर्ले या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आशिष कावळे, प्रा. लक्ष्मीकांत कापगते, प्रा. अंकित नाकाडे रा से यो कार्यक्रम अधिकारी, डॉ. शरद मेश्राम प्रा. अजय राऊत, संचित राखडे, सलोनी बोरकर, करीना हाडगे व इतर रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.