29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वीज सुरक्षेला प्राधान्य द्या;अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वीज सुरक्षेला प्राधान्य द्या;अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

0
108

blank

नागपूरदि. 23 ऑगस्ट 2024 – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात व घरगुती वीज पुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महवितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणी साठी घरगुती वीज पुरवठ्याच्या वीजदरा दरानेच वीजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीज जोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी.

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी 24 तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक 1912, 19120, 18002123435 किंवा 18002333435 यावर संपर्क साधावा  अथवा मोबाईल क्रमांकाची नोंद असलेले वीज ग्राहक त्यांच्या नोंदणिकृत मोबाईलवरून 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल करून अथवा NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक> असा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर पाठवून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार देवू शकतात. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुरक्षा महत्वाची

v गणेशोत्सव, नवरत्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

v वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब बाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकीत अपघात होण्याची शक्यता असते.

vजवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानीचा संभाव्य धोका अधिक आहे.

v वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी.

v तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.

blank