सीईओ एम.मुरुगानंथम यांची”आपला दवाखाना” व “नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र”ला भेटी

0
123

गोंदिया-दि.२४ः-तिरोडा तालुक्यातील “आपला दवाखाना” जाकीर वार्ड  व “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र “अशोक वार्ड ह्या दोन्ही ठिकाणी भेटी देवुन आरोग्य संस्था मार्फत देत असलेल्या आरोग्य सेवाची पाहणी करुन शहरातील जनसामान्य, गोरगरीब व झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना गुणवत्तापुर्वक सेवा देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकारी व कार्यरत कर्मचार्यांना दिले.यावेळी त्यांचे सोबत तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात 50% पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरी भागातील जनसामान्य,गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र 15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्ती पासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे, काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत होते.तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी,सातत्यपूर्ण,आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी,विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी,तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरिता हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना  च्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात येत असल्याची माहीती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील 12 नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र  ठिकाणे –
1) गोविंदपुर/ शास्त्रीवार्ड.
2) मरारटोली.
3) रामनगर .
4) कस्तुरबा वार्ड.
5) बाजपेई चौक.
6) गणेश नगर
7) पाल चौक
8) बुद्ध विहाराजवळ, चिचगड रोड , देवरी
9) दुर्गा चौक, मेनरोड ,गोरेगाव
10) नगर पंचायत जवळ, सडक अर्जुनी रोड, सडक अर्जुनी
11) वन विभाग कार्यालय जवळ, दरेकसा रोड,सालेकसा
12) अशोक वार्ड, तिरोडा

जिल्ह्यातील हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठिकाणे –
1) गोंदिया शहर – “आपला दवाखाना” छोटा गोंदिया, गोंदिया
2) तिरोडा शहर – “आपला दवाखाना” जाकीर वार्ड , तिरोडा.
3) आमगाव – “आपला दवाखाना” कामगार चौक, वॉर्ड क्र.2, लांजी रोड, आमगाव.
4) अर्जुनी मोरगाव- “आपला दवाखाना” मोरगाव वॉर्ड क्र.5, हनुमान मंदिराजवळ, अर्जुनी
मोरगाव.
हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र     मध्ये खालील प्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
1) बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी 2.00 ते रात्री 10.00)
2) मोफत औषधोपचार
3) मोफत तपासणी
4) टेली कन्सल्टेशन
5) गर्भवती मातांची तपासणी
6) लसीकरण
तसेच या केंद्रामध्ये उपरोक्त सेवांच्या व्यतिरिक्त खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करून दिल्या जातील
1) महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी
2) बाह्य यंत्रणेद्वारे ( एच.एल-एल.कंपनी मार्फत) रक्त तपासणीची सोय
3) मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा
4) आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा
दोन्ही केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार खालील माध्यमातून बाह्यहरुग्ण विभागातील खालील विशेषतज्ञ संदर्भ सेवा विशेष विशेषतज्ञांमार्फत भविष्यात प्रदान करण्यात येणार आहे.
1) भिषक (फिजिशियन)
2) स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ
3) बालरोग तज्ञ
4) नेत्ररोगतज्ञ
5) त्वचारोग तज्ञ
6) मानसोपचार तज्ञ
7) नाक कान घसा तज्ञ
सदर तज्ञ सेवा या सायंकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. जेणेकरून झोपडपट्टी भागातील व शेतातील मजूर कामावरून परत आल्यानंतर या सेवाचा लाभ घेतील.
दोन्ही केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स ,बहुउद्देशीय कर्मचारी ,अटेंडंट/ गार्ड आणि सफाई कर्मचारी ई.चा मनुष्यबळाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी ” हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना  व 12 नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे कार्यरत आरोग्य संस्थेत लोकांनी मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी एम.मुरुगानंथम यांनी नागरिकांना केले आहे.