देवरी,ता.२५: इस्लाम धर्माचे श्रद्धास्थान पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहो अलेही वसल्लम यांच्या विरोधात महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे, याची योग्य चौकशी करून एफ.आय.आर. दर्ज करावी. या मागणीला घेउन स्थानिक मुस्लिम समाजाने देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना गेल्या शुक्रवारी (दि.२३) रोजी निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात देवरीच्या मुस्लिम समाजाने म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र राज्यातील पाचळे गाव. सिन्नर जिल्हा नाशिक येथे एका प्रवचनाच्या वेळी महंत रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद सल्लल्लाहो अलेहे वसल्लम यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यामुळे आमचे मोहम्मद सल्लल्लाहु अलेहे वसल्लम यांचा आणि इस्लाम धर्माचा अपमान झाला आहे. आणि भारतासह जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
भोंदू रामगिरी महाराज यांच्या विरोधात महाराष्ट्रासह भारतातील अनेक शहरांमध्ये एफ.आय.आर. नोंदवण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक धर्मासाठी आदर आणि समतोल निर्माण करण्यात आला आहे. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहो अलेही वसल्लम यांच्या सन्मानाविरुद्धचा अहंकार कोणत्याही किमतीत खपवून घेतला जाणार नाही. राष्ट्रपती महोदया, आम्ही सर्व भारतीय मुस्लिम आपल्याकडून विनंती आणि मागणी करतो. यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास या मागणीला धरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जुनेद खान,मौलाना वहाब खान,जुबीन खान,हमीद मेमन,शकील कुरेशी,अय्यूब खान,अमान खान,मुन्ना अंसारी, माजिद खान,मतीन खान,इलियास कुरेशी,इमरान खान,सलीम खान,छोटेसाहब खान,इरशाद खान,आकिब बेग,इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते.