अमरावती -महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यरत अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार पदावर नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे आदेश क्रमांकः पदोन्नती २०२४/प्र.क्र.११४/ई-९ नुसार दि.२२ ऑगस्ट,२०२४ ला काढलेल्या शासन आदेशानुसार अमरावती विभागातील अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील खालील तक्त्यात नमूद कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत,गट-ब) या संवर्गात सन २०२३-२४ या निवडसूची वर्षात सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सहमतीनुसार नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे.