आंबेतलाव येथे बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा..बैलजोडी मालकांचा सत्कार

0
147

आंबेतलाव येथे बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा..
गोरेगाव,दि.०३- तालुक्यातील ग्राम आंबेतलाव येथे बैलपोळा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट बैलजोडीमालकांचा गिरधारी बघेले(सभापती, कृ. उ. बा. स.) यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.बैलपोळा उत्सवाचे हे दुसरे वर्ष होते. यावेळी निर्णायक मंडळाकडून उत्कृष्ट बैलजोडीचे परीक्षण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक प्रल्हाद बघेले,द्वितीय क्रमांक मालिकराम बघेले,तृतीय क्रमांक पन्नालाल बघेले या जोडीमालकांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गोवर्धन पटले,शामराव चौधरी,चिरणलाल बोपचे,गुणीलाल बारसागडे,टिकाराम कटरे,भोजलाल चौधरी,बुधराम बघेले या जोडीमालकांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कृषि संस्कृती मधील आनंदाचा, मुक्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आपल्या हिंदू धर्मातील हा महत्त्वाचा सण. जगाचे पोट भरणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात यावी. शेतकरी बांधवांनी त्यांची योग्य काळजी घ्यावी त्यांच्यावर जिवापाड प्रेम करण्यात यावे हा यामागचा उद्देश आहे असे टेकेश चौधरी यांनी सांगितले.
राजुभाऊ चौधरी, फनिंद्रभाऊ पटले, योगेश चौधरी, लोकराज बघेले, टामराज बोपचे, खेमराज पारधी, युवराज बघेले, हेमचंद चौधरी,टेकेश चौधरी,पुरुषोत्तम चौधरी, एम.बी.मडावी यांच्या निर्णायक मंडळाकडून उत्कृष्ट बैलजोडीचे परीक्षण करण्यात आले. यावेळी सर्व बळीराजा बांधव, गावकरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश बघेले व महेश चौधरी यांनी सहकार्य केले.