मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिवस उत्साहात

0
377

गोरेगाव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव येथे 5 सप्टेंबर हा दिवस डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती निमित्त शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन अंतर्गत शिक्षकांची भूमिका साकारात अध्यापणाचे कार्य केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यारपणाने करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी संस्था सचिव प्रा. आर. डी. कटरे, प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्रशा.अधिकारी सी. बी. पटले, प्राचार्या सौं.सी.पी.मेश्राम,पर्यवेक्षक कु.एस.डी.चिचामे हे उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर काही विध्यार्थ्यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष, प्रमुख अतिथी यांनी शिक्षक दिनाचे औचिता साधून विध्यार्थी जीवनातील शिक्षकाचे महत्व व स्थान पटवून देत मार्गदर्शन केले. शिक्षक दिनानिमित्त संस्था सचिव यांच्या कडून शिक्षकांना शिक्षकांचे गौरव म्हणून पेन भेट देण्यात आली. विध्यार्थ्यांकडून शिक्षकांनकरिता बलून ब्लास्ट खेळाचे आयोजन करण्यात आले. खेळात विजयी शिक्षकांना शालेय मंत्रिमंडळाकडून बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 10 वि चे विध्यार्थी अंशुल एम. कटरे, देवांश जी.रहांगडाले यांनी तर आभार कु. तुलसी बिसेन हिने मानले.