गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून उड्डाण पूल आणि रस्त्याचे नवनिर्माण कार्य सुरु असून नव्याने तयार करण्यात आलेल्या उडाण पुलावर पहिल्याच पावसात रस्ता सुरु होण्या आधी मोठ मोठ्या भेगा पडल्या असून अग्रवाल गोलोबल कंपनी हि निकृष्ट दर्जाचे कामे करीत असल्याने या ठिकाणी कधीही मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्यावतीने 9 सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तर बाम्हणी गावा जवळ तयार करण्यात आलेल्या पुलाजवळ डायव्हर्शन देण्यात यावा याला कारण म्हणजे पुलापासून 4 किलो मीटर अंतरावर डायव्हर्शन देण्यात आल्याने चार गावातील लोकांना चार किलोमीटरचा अंतर ओलांडून यावा लागत असल्याने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून लवकरच या ठिकाणी डायव्हर्शन तयार करून देऊ तसेच या पुढे अग्रवाल ग्लोबल कंपनी मार्फत बांधकामात दुर्लक्ष होणार नाही अशी हमी प्रोजेक्ट म्यानेजर व सुरेनदर सिग परिहार लायजनींग अधिकारी AGPL कंपनीने दिली आहे. या आंदोलनाची दखल अग्रवाल ग्लोबल कंपनीने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने घेतली नाही तर या पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष शैलेश जैस्वाल, राजू पटले, युवासेना जिल्हा प्रमुख महेश डूंभरे, तालुका अध्यक्ष मनोज रामटेके सह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.