सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू

0
180

गोंदिया : देवरी तालुक्यातील येळमागोदी गावात मध्यरात्री झोपलेल्या मायलेकींना विषारी सापाने दंश केला. त्यांना चिचगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिचगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कमळाबाई सुखीराम उसेंडी (३०) रा.येळमागोदी, मंजु सुखीराम उसेंडी (०६) रा.येळमागोदी असे मृत मायलेकींची नावे आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली.

कमळाबाई व तिची चिमुकली लेक मंजु हे दोघे जवळ-जवळ झोपले होते. रात्री २ वाजता सुमारास विषारी सापाने दोघांना दंश केला. दोघींना चिचगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र कमळाबाईची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला लगेच गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मंजुवर चिचगड रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र दोन्ही मायलेकींचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.