डॉ. भारत लाडे यांच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
26

अर्जुनी मोर.– यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोंडगाव/देवी व डॉ. भारत लाडे मित्रपरिवार यांनी समाजातील गरजू जनसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा व त्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचाराची सोय केली आहे.
श्री गणरायाच्या आशीर्वादाने व जणकल्यानाच्या भावनेने मागील 12 वर्षांची परंपरा कायम राखत यावर्षीही दिनांक 09 सप्टेंबर 2024 ला बोंडगावदेवी येथे डॉ. भारत लाडे मित्र परिवार ,व सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ बोंडगाव/देवी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी मोतीबिंधू शस्त्रक्रिया, उपचार व मोफत चष्मे वितरण सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ बोंडगाव/देवीच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात 1162 रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली. या मध्ये अनुभवी डाक्टरांकडून 701 रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. व 302 रुग्णांना निशुल्क मोतीयाबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्यानुसार मोफत औषध, डोळ्यांची मोफत तपासणी व लगेंच मोफत चष्मे वितरण करण्यात आले. या शिबिरामध्ये -राधेश्याम झोडे, दिलीप बोरकर,कैलास घावडे, रमेश पर्वते, सचिन नाकाडे यांच्याकडून येणाऱ्या रुग्णांना भोजन देण्यात आले
शिबिराच्या प्रसंगी मा. प्रमोदभाऊ पाऊलझगडे, रवींद्र खोटले, डॉ कुंदनकुमार कुरसुंगे,लतेसजी बहेकार, खुशाल तवाडे, कैलास घावडे, योगेश बारस्कर, राजेश बोरकर, दिलीप बोरकर, दिनेश नेवारे आणि सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. या कार्यक्रमाचे संचालन दिलीप बोरकर यांनी केले.