लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन 14 सप्टेंबरला

0
90
  • पवार सांस्कृतिक भवनात भव्य महाशिबिराचे आयोजन

          गोंदिया, दि.10 :  जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया येथील लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन 14 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता होणार आहे. तसेच 14 सप्टेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पवार सांस्कृतिक भवन, कन्हारटोली, लक्ष्मीनगर, गोंदिया येथे कायदेविषयक, शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी भव्य महाशिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भव्य महाशिबिरामध्ये सर्व शासकीय कार्यालयांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनेबद्दल व त्यापासून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी या शिबिरात शासनाच्या संबंधित विभागाचे वेगवेगळे अंदाजे 55 स्टॉल लागणार आहेत व संबंधित अधिकारी/कर्मचारी सदर लाभ मिळण्याकरीता लाभार्थ्यांना मदत करणार आहेत.

         तरी ज्या लाभार्थ्यांना या भव्य महाशिबीर कार्यक्रमामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी सदर योजनेच्या लाभांसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे- राशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीजबील देयक, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट फोटो, छायांकीत असलेले कोणतेही शासकीय ओळखपत्र, जन्म दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत संबंधीत विभागांकडे सादर करुन त्याबाबतची योग्य ती कार्यवाही पूर्ण करुन या भव्य महाशिबिरामध्ये उपस्थित राहून सदर शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.टी.वानखेडे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के.वाळके यांनी केले आहे.