गोंंदिया,दि.१६ः-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय व जिल्हा प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी दि.14 सप्टेंबर रोजी पोवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबईचे वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी न्यायमूर्ती नितीन सांबरे वरिष्ठ न्यायमूर्ती नागपूर खंडपीठ उच्च न्यायालय मुंबई,न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी नागपूर खंडपीठ उच्च न्यायालय मुंबई व पालक न्यायमूर्ती न्यायीक जिल्हा गोंदिया,सदस्य सचिव महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई समीर अडकर, अरविंद वानखेडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, जिल्हाधिकारी प्रजीत नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,पोलीस अधीक्षक गोरख भांबरे उपस्थित होते.
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात ग्रामपंचायत,नगर परिषद,पोलीस,वन,महिला व बालविकास,पोष्ट,रेल्वे,महाराष्
जनजागृती स्टॉलच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक योजना जसे प्रधानमंत्री मातृवंदन योजना,जननी सुरक्षा कार्यक्रम,जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,आभा कार्ड,मानव विकास कार्यक्रम यासोबत आरोग्य विषयक विविध आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपचार यांचे सुद्धा प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली.महामेळाव्यात आयुष ,योगा, मानसिक आजार, सिकलसेल व असासंर्गिक आजारा जसे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार,कि
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्या दरम्यान सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,कुष्ठरोग कार्यक्रमाचे डॉ.गेडाम,वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास विंचुरकर,जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी विजय आखाडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मीना वट्टी, असासंर्गिक कार्यक्रमाचे डॉ.स्नेहा वंजारी, डॉ.कांचन भोयर, नेत्ररोग विभागाचे भाविका बघेले,सिकलसेल विभागाचे सपना खंडाईत, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाचे संजय बिसेन,हिवताप विभागाचे नंदकिशोर भालेराव,आरोग्य विभागाचे प्रमोद काळे,स्वाती पाटील, आशा सेविका,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती.