गोंदिया, दि.18 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये 17 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिनानिमीत्त पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. यावेळी बाह्यरुग्ण विभागामध्ये उपस्थित डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी जागतिक रुग्ण सुरक्षा दिनानिमीत्त संस्थेत मिळणाऱ्या सेवा आणि सुरक्षा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बागडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगांबर मरसकोल्हे, समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर, गोपाली खोटे, रोशन मस्के, योगेश सोनवाने, पुजा डांगोरे, पुजा शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन करुन उपस्थितांचे आभार समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन ढोले, शैलेश बंसोड, हरिचंद्र कटरे व धीरज चव्हाण यांनी सहकार्य केले.