गणेश मंडळाने आरतीचा मान देवुन केला नागरी सत्कार
अर्जुनी मोर.- अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात गणेशोत्सवानिमीत्य सर्वच गावात धार्मिक वातावरणात दहा दिवस धामधुम सुरु होती.सर्वत्र प्रशन्न वातावरण निर्माण झाले होते. अशा समृध्द आणी धार्मिक वातावरणात सदैव सहभागी होणारे व सर्व धर्म समभाव जपणारे अर्जुनी मोर. नगरपंचायत चे नगरसेवक तथा युवा सामाजीक कार्यकर्ते तथा युवक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दानेश साखरे यांचा दुर्गा चौक अर्जुनी मोर येथील गणेश मंडळाने आरतीचा मान देवुन तथा शाल श्रीफळ देवुन नागरी सत्कार केला.
अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात गणेशोत्सवानिमीत्य दानेश साखरे यांनी बहुतांशी गावांना भेटी दिल्या. व गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे पुजाअर्चा केली.तसेच गणरायांकडे विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरीकांना सुख शांती व समाधान लाभण्यासाठी प्रार्थना केली. यासोबतच मंडळांचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी व विविध गावातील नागरीकांसी प्रत्यक्ष संवाद साधला. अनेकांच्या अडीअडचणी समजुन घेतल्या. दानेश साखरे हे अर्जुनी मोर तालुक्यातील युवा सामाजीक कार्यकर्ते आहेत.अत्यंत दानशुर व्यक्तीमत्व म्हणुन अल्पावधीतच त्यांनी आपली प्रचिती मिळविली.व याच माध्यमातून त्यांनी जनतेने दाखविलेल्या प्रेमामुळेच राजकिय क्षेत्रात आपला ठसा उमटवत पुढे अर्जुनी मोर. नगरपंचायत निवडणुक लढवून नगरसेवक म्हणुन आपली राजकीय कारकिर्द सुरु केली.प्रफुल पटेल,अजीत पवार व राजेंद्र जैन यांचेवर अपार प्रेम दाखवीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेस मधे समरस झाले.आज महायुती गठबंधन मधे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी अजीत पवार गटाला ही जागा सुटली तर दानेश साखरे हे उमेदवारीच्या यादीत अग्रस्थानावर दिसुन येत असल्याने त्यांनी आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा संपुर्ण अर्जुनी मोर. विधानसभेत उमटवीला आहे.आणी त्यांच्या कार्याची पावती म्हणुन गणेशोत्सवानिमीत्य दानेश साखरे यांचा विविध गावात मानसन्मान होवुन सत्कार सुध्दा करण्यात आला.