आमदार रहांगडालेंच्या हस्ते रस्ते व सभामंडप बांधकामाचे भूमीपूजन

0
104

तिरोडा:-तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात रस्ते व सभामंडप बांधकामाकरिता आमदार विजय रहांगडाले यांनि २५१५ योजनेअंतर्गत निधी शासनाकडून मंजूर करवून घेतले असून सदर कामांचे भूमिपूजन आमदार रहागंडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये प्रामुख्याने चीरेखणी येथे माता मंदिरसमोर सौंदर्यीकरण करणे ५.०० लक्ष, करटी बूज. येथे रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, चांदोरी खुर्द येथे शिवाजी चौक सौंदर्यीकरण करणे ५.०० लक्ष,बघोली येथे गोवारी स्मारकाजवळ सभामंडप ५.०० लक्ष, परसवाडा येथे रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, ढीवरटोली ( किंडगीपार ) येथे सभामंडप ५.०० लक्ष, अत्री सभामंडप व रस्ता बांधकाम ३१.०० लक्ष रुपये अशा एकूण ६७.०० लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, जि.प.सदस्य पवन पटले, चत्रभूज बिसेन, प.स. उपसभापती हुपराज जमाईवार, प.स.सदस्य चेतलाल भगत, उपसरपंच गेंदलाल राणे, कृउबास संचालक घनश्याम पारधी, सरपंच सविता अंबुले, गिरिष तुरकर, उषा बोपचे,संतोष साखरे,भास्कर येळे,महेश पटले, मुकेश भगत, सोशल मिडिया प्रमुख संजय पारधी, प्रकाश पटले, आशीष बघेले, कपूरचंद पटले, मधुसुदन बिसेन, आशिष बघेले, भूमेश्वर शेंडे, सोनू पारधी, कार्तिक भगत, कुंडलिक बोपचे, जितेंद्र बिसेन, व संबधीत गावाचे ग्रा.प.सदस्य, गावकरी उपस्थित होते.