1497रुग्णांनी घेतला लाभ
अर्जुनी मोर-मौजा.खांबी /पिंपळगाव येथे डॉ.भारत लाडे मित्र परिवार ,तालुका काँग्रेस कमिटी अर्जुनी मोर व सार्वजनिक मस्कऱ्या गणेश उत्सव मंडळ खांबी / पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य तपासणी मोतीबिंधू शस्त्रक्रिया, उपचार व मोफत चष्मे वितरण सार्वजनिक मस्कऱ्या गणेश उत्सव मंडळ खांबी/ पिंपळगाव च्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात 1497 रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली. या मध्ये तज्ञ डाक्टरांकडून 923 रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. व 257 रुग्णांना निशुल्क मोतीयाबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली डॉक्टरांच्या सल्यानुसार मोफत औषध, डोळ्यांची मोफत तपासणी व लगेंच मोफत चष्मे वितरण करण्यात आले.
या शिबिराचा परिसरातील गरीब, गरजू व वयोवृद्ध रुग्णांना मोफत वैद्यकीय लाभ घेता आला. आरोग्य तपासणीसाठी स्थानिकच नव्हे तर खांबी परिसरातील बहुसंख्य गरजू रुग्णांनी लाभ घेतला.शिबिराच्या प्रसंगी घनश्याम धामट ता काँग्रेस अध्यक्ष अर्जुनी मोर,प्रमोदभाऊ पाऊलझगडे समन्वयक काँग्रेस कमिटी, निरूपा बोरकर सरपंचा ग्रामपंचायत खांबी,मीनाक्षीताई मुणेश्वर,लक्ष्मीकांत नाकाडे, हितेश हत्तीमारे ता. अध्यक्ष युवक काँग्रेस, डॉ रुतन लोणारे, तुलाराम खोटेले,रवींद्र खोटेले,निकेश खोटेले, गोपाळा शिवणकर, महेंद्र खोटेले, सचिन फुंडे, मनोज खोटेले,नेमीचंद मेश्राम, विकास डुंबरे, प्रमोद डोंगरे, तुलाराम खोटेले, रेवीचंद फुंडे,आणि सार्व. मस्कऱ्या गणेश उत्सव मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम पार पडला.