सुधाकर आबाजी लंजे यांचे निधन

0
32

अर्जुनी मोर,दि.२३ः– तालुक्यातील कोरंभी येथील युवा शेतकरी सुधाकर आबाजी लंजे यांचे वयाच्या 35 व्या वर्षी आज 24 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास शेतात गेले असता तिथे पडल्याने त्यांना तात्काळ अर्जुनी मोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांच्या मागे आई-वडील पत्नी दोन मुली,एक मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले.