गोरेगाव– दि.२८सप्टेंबर- सहकारामध्ये प्राथमिक संस्था सेवा सहकारी संस्थेला अतिशय महत्त्व व मोलाचे स्थान आहे. तालुका, जिल्हा व राज्याच्या फेडरल बॉडीचे प्रतिनिधी व नेतृत्व सेवा सहकारी संस्थेतूनच ठरवले जाते पण गोरेगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावच्या पदाधिकाऱ्यांचे पाहिजे तसे समन्वय तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेशी नसल्याचे दिसून आले. दिनांक २७ सप्टेंबर २०२४ ला दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावच्या सभागृहामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमसभेत तालुक्यातील सर्व सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपस्थित राहणे अपेक्षितच असते पण गोरेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव च्या आमसभेत ५२ संस्थेपैकी फक्त ३ संस्थांचे अध्यक्ष हजर होते. बाकीच्या सर्वच सेवा सहकारी संस्थांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेवर बहिष्कार केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
याउलट त्याच दिवशी त्याच वेळी आयोजित सहकार महर्षी श्री रेखलाल टेंभरे डायरेक्टर को-आपरेटिव्ह बँक, गोंदिया यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात सर्वच संस्था अध्यक्ष व संचालक उपस्थित झाले. नुकतीच सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रमुख पदी सहकार महर्षी रेखलाल टेंभरे यांची *शिर्डी* येथील सहकार भारती च्या अधिवेशनात पुढील कारकीर्द साठी *प्रकोष्ठ प्रमुख* को-ऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्र प्रदेश पदी नियुक्ती करण्यात आली. करीता संपूर्ण तालुक्यात मोठा उत्साह दिन म्हणून सर्व सेवा सहकारी संस्थांच्या संघटनेच्या वतीने श्री रेखलाल टेंभरे यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यात सर्व संस्थांचे अध्यक्ष व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *या प्रसंगाने सहकार क्षेत्रावर डायरेक्टर रेखलाल टेंभरे यांचा निर्विवाद दबदबा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.